Karan Kundra and Tejasswi Prakash: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लव्ह बर्ड्स करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही खूप उत्सुक असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या एका फोटोनं सध्या इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. आता करण कुंद्राने तेजस्वीसोबतच्या रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये करण आणि तेजस्वी एकमेकांसाठीचे बनले आहेत असंच वाटत आहे. 


अलीकडेच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लिप किस करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता करण कुंद्राने तेजस्वीसोबतच्या नवा लिप लॉक फोटो शेअर केले आहे जे प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत त्यांचा रॉमेण्टिक मूड स्पेन्ड करताना दिसत आहेत. 



तेजस्वी प्रकाश केशरी रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला आहे तसेच तिनं ट्यूब टॉप घातलेला आहे. यासोबत तिने अतिशय टाईट फिटिंगचा मॅचिंग स्कर्टही घातलेला दिसतोय तर करण कुंद्राने ब्लॅक जीन्ससोबत गोल्डन आणि चॉकलेटी कॉम्बिनेशनचा कोट परिधान केला आहे.