मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमध्ये नाईकची भूमिका साकारणारा करण मेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करणने पत्नी निशा रावलवर फसवणुकीचा आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून दोघंही त्यांच्या लग्नामुळे चर्चेत होते. दरम्यान, आता करणने निशावर गंभीर आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी निशा रावलने करण मेहरावर घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंध असे गंभीर आरोप केले होते. यादरम्यान करणला तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र करणने या प्रकरणावर मौन बाळगलं. आपल्यावरील आरोप चुकीचे सिद्ध करण्याचा तो प्रयत्न करत होता. आता करण मेहराने मौन सोडलं आहे. यावेळी करणने निशावर गंभीर आरोप केले आहेत.


अनेक बातम्या समोर आल्या आहेत ज्यामध्ये करण मेहराने निशा रावलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण मेहरा म्हणाला, 'सगळं ऐकून घेतल्यानंतर मी तिला घरात येऊ दिलं. आम्ही नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. आता कळलं की मी गेल्यानंतर 11 महिन्यांपासून घरात एक बिगर पुरुष राहतोय. पत्नी आणि मुलांना सोडून तो माझ्या घरात आला आहे. सर्वांना माहित आहे आणि आता मी माझी लढाई लढणार आहे.


करण मेहरा पुढे म्हणाला, 'मी कोणत्याही परिस्थितीत तिचा खोटारडेपणा सिद्ध करेन. तिने माझा मुलगा माझ्यापासून काढून घेतला. माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीवर चिखलफेक. आता मी ते परत घेईन. गेल्या एका वर्षात मला भयंकर वेदना होत आहेत आता नाही.


निशाला पाठिंबा देणाऱ्या तिच्या तीन मित्रांवर बदनामीचा खटला भरल्याचा खुलासाही करणने केला आहे. करणच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल उचलणं आवश्यक होतं कारण जेव्हा निशा काही चुकीचं करत होती तेव्हा तिच्या मित्रांनीही तिला पाठिंबा दिला होता जे योग्य नव्हतं.


निशा रावल शेवटची कंगनाच्या शो लॉक अपमध्ये दिसली होती. यादरम्यान तिने एक मोठा खुलासा केला. ती म्हणाली होती की, विवाहित असूनही माझं कोणाशी तरी अफेअर होतं, तो माझा एकमेव चांगला मित्र होता. हे सांगताना निशाही भावूक झाली होती.


गेलं वर्ष निशा रावल आणि करण मेहरा यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण वर्ष होतं. निशाने करणवर मारहाणीचा आरोप करत त्याचं घर सोडलं होतं. निशा म्हणाली होती की, करण आणि त्याचे कुटुंबीय तिच्याशी वाईट वागतात. तसंच करण मेहराचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे.


निशानेही करणविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यामुळे करणला तुरुंगात जावं लागलं होतं. तुरुंगातून आल्यानंतर करणने दावा केला होता की निशा बायपोलर डिसऑर्डरची रुग्ण आहे. आता पुन्हा एकदा करण मेहरा आरोपांसोबत परतला आहे.