Bigg Boss 16 : बिग बॉसच्या प्रत्येक सीझनवेळी फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पहायला मिळतो. Bigg Boss 16 लवकर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक असतील, याविषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसतेय. अशातच आता प्रेक्षकांना Bigg Boss 16 सर्वात रागीट स्पर्धक पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सलमानचं देखील टेन्शन वाढलंय. (Karan Patel likely to participate in the upcoming Bigg Boss 16, demands a huge amount)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Bigg Boss 16 मध्ये ज्या स्पर्धकाची एन्ट्री होईल त्याने याआधी देखील बिग बॉसच्या घरात पाय ठेवलंय. अनेकदा तो बिग बॉसच्या घरात पाहुणा म्हणून आलेला आहे. हा अॅक्टर फक्त टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय नाही तर त्याच्या रागीट स्वभावामुळे देखील तो अनेकदा चर्चेत राहिलाय. आत्तापर्यंत त्याचं नाव ओठांवर देखील आलं असेल...


होय, एका रिपोर्टनुसार टीव्ही सिरीयलचा (TV serial) प्रसिद्ध कलाकार करण पटेल (Karan Patel) आगामी Bigg Boss 16 मध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. करण पटेलला आलेल्या ऑफर आली. करणने आलेल्या ऑफरवर होकार दिल्याची माहिती समोर आलीये. मात्र, करणने शोमध्ये हिस्सा घेण्यासाठी भलीमोठी रक्कम मागितली आहे.



दरम्यान, करणने एवढी मोठी रक्कम मागितली आहे की तो बिग बॉसमध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम मागणारा अभिनेता बनला आहे. मात्र, करण पटेल या शोमध्ये येणार की नाही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.