मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. यांच्या लव्ह स्टोरीबद्दल तर सगळ्यांनाच माहितच आहे. मात्र, लग्नाच्या आधी सैफला करीनासोबत लिव्हइनमध्ये रहायचं होतं. या बद्दल सैफने स्वत: करीनाची आई बबीता कपूरला विचारलं होतं. याचा खुलासा सैफने स्वत: केला आहे. तर, त्यावर करीनाच्या आईची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा करीनाने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ-करिनाचे लव्ह स्टोरीची सुरुवात ही टशन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुरु झाली. याआधी दोघांनी २००६ मध्ये ओंकारा या चित्रपटात काम केलं होतं. पण टशनच्या वेळी त्यांच्या प्रेमाला बहर आला. पण यामुळे करीना आणि तिची आई बबिता यांच्यात तणाव निर्माण झाला. बबिता या आपल्या मुली करिश्मा आणि करीना यांच्या आयुष्यावर पूर्ण ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतात असे म्हटले जात होते. पण त्यादरम्यान करीना आणि बबीता यांच्यामध्ये सैफबद्दल तणाव इतका वाढला की करीना तिच्या आईपासून वेगळी राहू लागली. करीना तिच्या आईच्या घरातून बाहेर पडली होती आणि मुंबईच्या उपनगरातील खार येथील फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. हा तोच फ्लॅट होता जो करीनाने शाहिद कपूरसोबत राहण्यासाठी घेतला होता. त्यावेळी सैफ अली खानही त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये राहत होता आणि करीना त्याच्यापासून अवघ्या 2 किमी अंतरावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा करीनाच्या आईचे घर सोडून वेगळे राहण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले.



तसेच, करीना आणि सैफ यांच्या वयात 13 वर्षांचे अंतर होते. असे असूनही दोघांनीही एकमेकांमध्ये आपला जीवनसाथी पाहिला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सैफने करिनाची बहीण करिश्मा कपूरसोबतही काम केले होते आणि तेव्हा करीना लहान होती. त्यावेळी लोकांना वाटायचं की करीना आणि सैफ या दोघांचा लवकरच घटस्फोट होईल. पण त्या दोघांनी हे सगळं खोटं असल्याचं दाखवून दिलं आहे. 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. आज सैफ आणि करीना एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत.


२०१९ मध्ये ‘ह्यूम्स ऑफ बॉम्बे’ला करीनाने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सैफसोबत लिव्हइनमध्ये राहण्यापूर्वी आईला सगळं माहितं पाहिजे म्हणून त्या दोघांनी मिळून करीनाची आई बबीताला सांगितलं. करीना म्हणाली सैफ माझ्या आईला म्हणाला, “आम्ही काही वेळेपासून एकमेकांना डेट करतोय. मी काही २५ वर्षांचा नाही आणि मी तिला रोज रात्री घरी सोडू शकत नाही. त्यामुळे मला माझं उर्वरित आयुष्य करीनासोबत घालवायचं आहे. आम्हाला एकत्र राहायचं आहे.”