मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरने 2012 मध्ये लग्न केलं. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत सैफ आणि करिनाचं लग्न होत. कारण सैफ, करिनापेक्षा वयाने फार मोठा आहे. एवढंच नाही, सैफचं अभिनेत्री अमृता सिंगसोबत घटस्फोट  झाला होता. त्याला दोन मुलं होती. मुलांची कस्टडी अमृताकडे असली, तरी करिना आणि सैफचं लग्न तुफान चर्चेत होत. आता सैफचं दुसरं लग्न झालं असलं तरी अभिनेता कायम पहिल्या कुटुंबामुळे चर्चेत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता आणि सैफ विभक्त झाले असले तरी, त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. 'कॉफी विथ करण'च्या शोमध्ये करिनाला सैफची पहिली पत्नी अमृताबद्दल विचारण्यात आलं. करणने करिनाला अमृतासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं. 



करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना करिना म्हणाली, 'लग्नानंतर मी कधीही तिला भेटली नाही. पण साराला बघून कळत अमृता एक उत्तम आई आहे. तिने मुलांना दिलेले संस्कार फार उत्तम आहेत. मी अमृताचा आदर करते.'


पुढे अभिनेत्री म्हणाली, 'साराकडे आई वडील आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाला आई म्हणून पाहण्याची तिला गरज नाही. सारा आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत..' असं देखील करिना यावेळी म्हणाली. 


करिनाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरचं 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करिनासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता आमिर खान दिसणार आहे.