मुंबई : बॉलीवूडमध्ये अफेअर्सची काही कमी नाही, अनेक प्रेम कहाण्या सुरू होतात, लव्ह ट्रँगल देखील तेवढेच, कुणाचं कुणाशी सुत जमेल काहीच सांगता येत नाही. असंच झालं करीना कपूर आणि शाहीद कपूरच्या प्रेमकहाणीत. सुरूवातीला शाहीद आणि करीना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते, पण यांच्यात असं काय झालं की, करीना कपूरने शाहीद कपूरची साथ सोडली, विशेष म्हणजे अनेक मुलाखतीत करीनाने मान्य केलं होतं की आपणच पहिल्यांदा शाहीद कपूरला फोन आणि मेसेज करून प्रेम व्यक्त केलं. शाहीद हा व्हेजेटेरीयन होता. आणि करीनाही नॉनव्हेज खाणारी, तरी देखील शाहीदसाठी तिने नॉनव्हेजचा त्याग केला होता, एवढं शाहीद-करीनाचं प्रेम रंगात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीद अभिनेता पंकज कपूर यांचा मुलगा तर करीना ही कपूर घराण्यातली मुलगी होती, करीनाच्या परिवारालाही शाहीद आवडत होता. पण करीना आणि शाहीद यांनी अनेक जाहीर प्रश्नांना उत्तर देताना प्रेमाची कबुली दिली होती. पण 'जब वी मेट'च्या शुटिंगच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चित्र बदललं, शाहीद आणि करीना यांच्यात अंतर वाढत चाललं होतं. अखेर एकाच कारने घरून येणार शाहीद-करीना आता वेगवेगळ्या कारने यायला लागले होते.


इकडे सैफ अली खानचा आपली पहिली पत्नी अमृता सिंहसोबत घटस्फोट झाला होता. आणि अचानक एका कार्यक्रमात सैफ अली खान आणि करीना एकत्र दिसले, आणि सैफ-करीनाने आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण करीना शाहीदपासून वेगळी होण्याचं कारण सैफ अली खान नव्हता, तर असं म्हणतात, की विवाह सिनेमात अमृता राव आणि शाहीद एकत्र आल्याने करीना दुरावली आणि त्यांच्यात ब्रेकअप झालं. 


हा वाद पुढे एवढ्या विकाोपाला गेला की, करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं, तर शाहीद कपूरने मीरा सोबत संसार थाटलाय. सुरूवातीला वाटणारं चित्र अगदी बदलंत गेलं.