मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेत्री तिच्या संपुर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. करिना तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीवमधील फोटो शेअर करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता होळीच्या निमित्ताने करिना मालदीवमध्ये गेली आहे. तेथे ती फॅमिली टाईम एन्जॉय करत आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करिनाच्या या फोटोत ना रंग आहे ना रंगपंचमीचं वातावरण...


पण तरीही लोक या फोटोचे कौतुक करताना थकत नाहीत. खरं तर, या फोटोमध्ये करिना तिचा दुसरा मुलगा जेहसोबत वाळूचा डोंगर बनवताना दिसत आहे.


फोटोमध्ये करीना आणि जेह बीचवर बसलेले दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. करीनाने वाळूचा एक छोटा ढिगारा बनवला आहे आणि जेह ते लक्षपूर्वक पाहत आहे.


आपल्या मुलासोबत खेळताना करिनाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'होळीच्या दिवशी आम्ही वाळूचा महाल बनवलं... होळीच्या शुभेच्छा'.



करिनाच्या या फोटोवर केवळ तिचे चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. करिनाला रंग खेळायला आवडत नाही. म्हणून तिने मुलासोबत वाळूमध्ये रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला आहे.