मुंबई : सध्या बॉलिवूडमधलं एक कपल चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर कपूर आता आई-बाबा होणार आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. आलिया देखील तिच्या येणाऱ्या बाळाबाबत उत्सूक आहेत. तिने फोटो शेअर करत तिची उत्सूकता दाखवली आहे. तिच्या प्रेग्नसींची चर्चा असताना काही दिवसापूर्वी करीना कपूर खान पुन्हा प्रेग्नेंट असल्याचं बोललं जात होतं. पण करीनानेच या चर्चांना पूर्ण विराम दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना प्रेग्नेंट होती. या दरम्यान टीमने तिची खूपच काळजी घेतल्याचं करीनाने म्हटले आहे. चर्चा सुरु असताना जेव्हा तिला आलियाच्या प्रेग्नसीबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती चांगलीच भडकली.


प्रेग्नंसीबाबत तुम्ही आलियाला काही टीप्स द्याला या प्रश्नावर करीना भडकली. ती म्हणाली की, मी इतर लोकांच्या प्रेग्नेंसीबद्दल का बोलावे आणि का प्रतिक्रिया द्यावी. या वेळी कोणीही काही बोलण्याच्या भानगडीत पडू नये. मलाही कोणी टिप्स दिल्या तर आवडणार नाही.'


करीना लंडनमध्ये सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.