मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे करीनानं काहीही केलं तरी तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. गेल्या काही दिवसांपासून करीना तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीमुळे चर्चेत होती. करीनानं नुकतचं या बातमीवर मौनं सोडलं आणि ती केवळ अफवा असून ती गर्भवती नसल्याचं तिनं सांगितलं. आता करीनानं या फोटो विषय अधिक माहिती दिली असून त्या फोटोत दिसत असलेल्या तिच्या बेबी बंपबद्दल सत्य सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर तिच्या सुट्टीचा आनंद घेऊन परतली आहे. लंडनमधील तिच्या आवडत्या ठिकाणी बेबोनं खूप एन्जॉय केलं. करीना तिथं गेल्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवाही सुरु झाल्या. ज्या फोटोमुळं ही चर्चा सुरु झाली होती, त्याच सत्य आता समोर आलं आहे. 



नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, करीनानं या बातमीवर हसत हसत उत्तर देत सांगितले की तो मॉर्फ केलेला फोटो आहे. करीना म्हणाली कि ती 40 दिवसांच्या सुट्टीवर होती, जिथे तिने भरपूर पिझ्झा खाल्ले. यानंतर, फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या पहिल्या इम्प्रेशनबद्दल बोलताना करीना म्हणाली की 'मी प्रेग्नंट नाही, मी काही मशीन आहे का? जी कितीही मुलांना जन्म देऊ शकते, शिवाय मुलांना जन्म देणं हि तिची स्वतःची निवड असेल.'


करीनाही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. करीना ही सैफ अली खान आणि तिच्या मुलांसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. 


करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय करीना विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत सुजॉय घोषचा 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' देखील दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून याच चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. सोबतच रिया कपूर आणि हंसल मेहता यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये करीना काम करणार आहे.