करिनाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीवर सैफची अशी प्रतिक्रिया
करिनाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीवर काय म्हणाला सैफ
मुंबई : अभिनेत्री करिना कपूर सध्या आपली दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर ऍक्टीव असलेली करिना आपल्या पहिल्या प्रेग्नेंसीप्रमाणे आता पण बेबमी बम्प फ्लॉन्ट करताना दिसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करिनाने आपल्या सेकेंड प्रेग्नेंसीवर सैफची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.
करिना म्हणाली की,'आमच्या घरी अतिशय नॉर्मल प्रतिक्रिया होती. कुणीच फिल्मी रिऍक्शन दिली नाही. अगदी सैफची देखील नॉर्मल प्रतिक्रिया होती. करिनाने झूमला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
'माझ्या घरी कुणीच फिल्मी नाही. सैफ कायमच नॉर्मल आणि रिलॅक्स असतो. जेव्हा सैफला दुसऱ्या गरोदरपणाबाबत कळलं तेव्हा खूप खूष होता. दुसऱ्या प्रेग्नेंसीचं काही ठरलं नव्हतं. पण आम्हाला हे सगळं सेलिब्रेट करायचं आहे. आम्ही सगळं एन्जॉय करतोय.'
काही दिवसांपूर्वीच करिना-सैफने आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला आहे. याच दिवशी करिनाने आपल्या आनंदी संसाराचं गुपित सांगितलं. एकमेकांना खूप दिवस डेट केल्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी करिना आणि सैफने लग्न केलं. या दोघांच्या मुलाची तैमूरची सोशल मीडियावर खूप चर्चा असते. करिना लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देत आहे. मार्च मध्ये करिनाची दुसरी डिलिव्हरी होणार आहे.