`मां की सेवा इस...` म्हणत करीनाने शेअर केला तैमुरचा फोटो; सर्वांकडूनच होतोय कौतुकाचा वर्षाव
Kareena Kapoor Shared Taimur`s Photo : तैमूर अली खाननं केलेलं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव, एकदा तुम्हीही पाहाच...
Kareena Kapoor Shared Taimur's Photo : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरी करण्यासाठी परदेशात गेली होती. तिच्या या सुट्टीचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तैमूर चक्क त्याची आई करीना कपूरच्या हील्स हातात घेऊन चालताना दिसला. त्याचे फोटो करीना कपूरनं शेअर केले आहेत. करीनानं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. करीना कपूर खान नुकतीच स्विट्जरलॅंडमध्ये कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत होती.
करीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. करीना एका कार्यक्रमातून येत असताना तैमूरनं आई करीनाच्या हील्स हातात घेतल्या होत्या. जेणे करून त्याची आई ही आरामात चालू शकेल. तर कोणत्याही आई प्रमाणे करीनालाही गोष्ट आवडली आणि तिनं तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. तर तैमूरचं हे कृत्य पाहून अनेक स्त्रीयांना हेवा झाला आहे की त्यांनीही लग्न करावं आणि त्यांच्या मुलानं असं करावं. तर करीनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूरनं एका हॉटेलच्या हॉलवेमध्ये चालताना दिसतो. तर त्यानं काळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला आहे आणि त्यांच्या हातात स्टिलेटोस हील्स पकडल्या आहेत. तैमूरचे हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'आईची सेवा या वर्षी आणि कायमसाठी. सगळ्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा आणि आणखी फोटो येणार आहेत.'
हेही वाचा : पाकिस्तानी अभिनेत्रींना बॉलिवूड गाण्यांची क्रेझ! 'या' गाण्यांवर केला धडाकेबाज डान्स
या पोस्टवर रिअॅक्शन देत काही नेटकरी म्हणाले, तो एक खरा पतौडी जेंटलमेंट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, 'तैमूर एक जेंटलमॅन आहे. देवाचा नेहमी तुझ्यावर आशीर्वाद राहू देत.' तिसरा नेटकरी म्हणाला, किती सुंदर आणि संस्कारी आहे तुमचा मुलगा. हर्षदीप कौरनं लिहिलं की 'ओह्ह, खूप सुंदर फोटो आहे.' याशिवाय करीनाची वहिणी अनीसा मल्होत्रा जैननं लाल रंगाचं हार्ट इमोजी कमेंट बॉक्समध्ये शेअर केलं असून 'बेस्ट बॉयज' म्हटलं आहे.'