Pakistan Actress Hania Aamir Video : पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री हनिया आमिरनं चित्रपटांसोबतच उर्दू सीरिजमध्ये देखील काम करते. तिनं तिच्या करिअरची सुरुवात ही 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या जनानमधून केली. त्यासाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीसाठी लक्स स्टाइल अवॉर्ड देत सन्मानित करण्यात आलं. सध्या ती चर्चेत येण्याचं कारण तिचा कोणता चित्रपट किंवा प्रोजेक्ट नाही तर तिचा एक व्हायरल व्हिडीओ आहे. तिचे बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणारे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आहेत. सगळीकडे तिच्या या डान्स व्हिडीओचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री यासमा गील देखील होती.
हानिया आणि यासमा या दोघींनी माधुरी दीक्षित आणि मनिषा कोयराला या दोघींच्या 'बड़ी मुश्किल' या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लज्जा' या चित्रपटातील हे गाणं आहे. त्याशिवाय त्यांनी संजय दत्त आणि शिल्पा शेट्टीच्या 'आयला रे लड़की मस्त मस्त' हे 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जंग' या चित्रपटातील गाण्यावर देखील त्या नाचल्या. त्याशिवाय 'दिल लुटिया' या गाण्यावर सगळ्यात हायलाइट म्हणजे कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली' या गाण्यावर डान्स केला. हे गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटातील आहे.
हेही वाचा : आज 5 लाखांचे बूट घालतो कृष्णा अभिषेक; पण कधीकाळी चोरायचा मामा गोविंदाचे कपडे
याशमा शाहरुख आणि काजोलच्या 'मेहंदी लगाके रखना' या गाण्यावर डान्स केला. हे गाणं 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील आहे. सुखविंदर सिंग यांच्या 'बन ठन चली' या गाण्यावर देखील त्यांनी डान्स केला. या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आजवर अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. तमन्ना भाटियाच्या 'आज की रात' या 'स्त्री 2' मधील गाण्यावर, रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या 'ढिंढोरा बाजे रे' या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील गाण्यावर देखील अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी थिरकले आहेत. याशिवाय वरुन धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटातील 'नैन मट्टका' आणि 'रेस' या चित्रपटातील कतरिना कैफचं 'ख्वाब देखे झूठे मूटे' या गाण्यावर देखील डान्स केला.