करिना कपूरच्या टिकलीचा काय आहे Malabar Gold शी संबंध? लोकांकडून बहिष्काराची मागणी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा करीना कपूर चर्चेत आली असून यावेळी ती टिकली न लावल्याने लोकं तिला ट्रोल करत आहेत. करीना कपूरला आता सोशल मीडियावर काही यूजर्सकडून त्रास दिला जात आहे.
करीना कपूर ट्रोल
यावेळी अभिनेत्री करीना कपूर 'मलबार ग्रुप' या लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडशी संबंधित एका जाहिरातीमुळे वादात सापडली आहे. वास्तविक, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 'मलबार ग्रुप'ने एक जाहिरात जारी केली आहे. ज्यामध्ये करीना कपूरच्या कपाळावरची टिकली दिसत नाही. करिनाच्या कपाळावरुन टिकली गायब झाल्यामुळे सोशल मीडिया युजर्सना धक्का बसला आहे आणि आता ते अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करत आहे.
सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी
सोशल मीडिया युजर्स अभिनेत्री करीना कपूरसोबतच ज्वेलरी ब्रँड 'मलबार ग्रुप'चे मालक एम पी अहमद यांनाही ट्रोल करत आहेत आणि त्यांना प्रश्न विचारत आहेत की, ही जाहिरात कोणत्या विभागाला टारगेट करत आहे. मलबार ग्रुपच्या जाहिरातीत करीना कपूरला टिकली लावलेली नसलेली पाहून सोशल मीडिया युजर्स संताप व्यक्त करत आहेत आणि मलबार गोल्डवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. आता #Boycott_MalabarGold आणि #NO_Bindi_No_Business च्या हॅशटॅगने ट्विटर भरलं आहे.