मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅन्सचे अनेक किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत देखील. पण बॉलिवूड बेबो सोबत काही दिवसांपूर्वी एक असा किस्सा घडला ज्यामुळे ती आणि तिच्यासोबत असणारी सर्व मंडळी अगदी चकितच झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिना कपूर रेग्युलर सेशनसाठी बांद्रा स्थित एका पार्लरमध्ये गेली होती. आपलं सेझन संपवून बाहेर निघताच करिनाच तिच्या आजूबाजूला चाहत्यांचा गराडा होता. अशातच एक अतिशय वृद्ध महिला करिनाच्या पाठीमागे धावू लागली. लोकांना बराच वेळ नेमकं या म्हातारी स्त्रीचं काय सुरू आहे हे कळलं नाही. पण नंतर लक्षात आलं तेव्हा साऱ्यांनीच कपाळावर हात मारला. 




ही सगळी मेहनत त्या म्हाताऱ्या बाईने केली ती बेबोसोबतच्या एका स्लेफीसाठी. आणि करिना कधीच आपल्या फॅनला निराश करत नाही. मग ते तरूण असोत वा असे म्हातारे. तिने थांबून त्या महिलेसोबत फोटो काढला. एवढंच नाही तर काही वेळ त्या स्त्रीशी उभ्या राहून गप्पा देखील मारल्या. आणि त्यांच्यातील गप्पा इतक्या रंगल्या की काही फॅन्सनी त्या दोघांचे ते क्षण कॅप्चर केले. यावेळी करिनासोबत सोनम कपूरची लहान बहिण रिया देखील होती.