बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांचा जेव्हा कधी उल्लेख होतो तेव्हा सैफ अली खान आणि करीना कपूर यांचंही नाव घेतलं जातं. दोघांमधील वयाचं अंतर तसंच सैफ अली खानचं दुसरं लग्न यामुळे त्यांची सुरुवातीला फार चर्चा रंगली होती. आता दोघंही संसारात रमली असून तैमूर आणि जेह या दोन मुलांमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे करीना कपूरने लग्न झाल्यानंतर तसंच आई झाल्यानंतरही चित्रपटांमधून ब्रेक न घेत बॉलिवूडच्या अभिनेत्रीसंमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यातही अनेकदा करीना कपूर आपल्या बिनधास्त वागण्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूरने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर आपल्याला आता सैफ अली खानला सोडून द्यावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी तिने आपल्याला अर्जून कपूरशी लग्न करावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं. "मला कधीकधी वाटते की, मी सैफ अली खान सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करावं," असं करीना या मुलाखतीत म्हणाली होती. 


करीनाचं हे विधान ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. याचं कारण सैफ आणि करीनाला एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. तर दुसरीकडे अर्जुन कपूरचं मलायकाशी अफेअर असल्याने त्यांच्यात तर काही वाद झालेला नाही ना अशीही चर्चा रंगली. पण करीनाची ही मुलाखत जुनी आहे. एका चित्रपटाचं प्रमोशन सुरु असल्याने त्या पार्श्वभूमीवर करीनाने हे विधान केलं होतं.


त्यावेळी करीना कपूर आणि अर्जुन यांचा 'की अँड का' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांनी विवाहित जोडप्याची भूमिका निभावली होती. चित्रपटात अर्जुन कपूर हा घऱकाम करणारा नवरा तर करीना ऑफिसला जाणारी पत्नी दाखवण्यात आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. 


या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांनी अनेक माध्यमांना मुलाखत दिली होती. अशाच एका मुलाखतीत करीनाला करीनाला तिच्या ऑनस्क्रीन पती आणि ऑफस्क्रीन पतीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना करीना कपूर म्हणाली होती की, "कधीकधी मला वाटते की, मी सैफला सोडून अर्जुनसोबत लग्न करावे". करीनाने हे गंमतीत म्हटलं होतं. यावेळी खरं तर ती अर्जुन कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत होती. 


या चित्रपटात करीनाने अर्जुन कपूरसह किसिंग सीनही दिले होते. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. करीना कपूर विवाहित असल्याने तिने किसिंग सीन कसे काय दिले असा अनेकांचा आक्षेप होता. करीनाने या मुलाखतीत त्या टीकाकारांनाही उत्तर दिलं होतं. 


लग्नानंतर पतीसोबतच्या किसिंग सीनबाबत काही धोरण आखलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ती म्हणाली, आमच्या दोघांमध्ये असं कोणतंही धोरण नाही. जेव्हा चित्रपटात आवश्यक असेल तेव्हा किसिंग सिन द्यावे लागतात. सैफनेही अनेकवेळा किसिंग सीन दिले आहेत आणि या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका केल्यामुळे अर्जुन कपूरसोबत किसिंग सीन दिला आहे.