मुंबई : करीन कपूर खानचा क्यूट मुलगा तैमूर लहानग्या वयातच स्टार बनलाय. कपूर खानदानातले बरेचसे बॉलीवूडमध्ये आहेत. करीना कपूरच्या सासरीही अनेक जण फिल्म इंडस्ट्रीशी जोडले गेलेत. यामुळे तैमूरही मोठा झाल्यावर बॉलीवूडमध्येच करिअर करेल की काय असे अनेकांना वाटते. मात्र याबाबत करीनाचे वेगळेच मत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने अबरामच्या भविष्याबाबत बोलतानैना म्हटले की, त्याला फुटबॉल खेळायला आवडते मात्र तो हॉकी खेळल्यास मला आवडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका सोहळ्यात जेव्हा करीनाला विचारण्यात आले की तैमूरसाठी ती कोणते करिअर निवडेल. यावर उत्तर देताना करीना म्हणाली, हे मी नाही तर तैमूरच ठरवेल की त्याला काय करायचे आहे. मात्र तरीही त्याने क्रिकेटर व्हावे असे मला वाटते. 


सैफ अली खानचे वडील दिवगंत मंसूर अली खान पटौदी हे प्रसिद्ध क्रिकेटर होते. आता तैमूर मोठा होऊन क्रिकेटर बनतो अथवा अॅक्टर की अजून काही...यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागेल.


एका मुलाखतीत करीनाला तैमूरच्या मीडिया कव्हरेजबाबत विचारले असता ती म्हणाली होती, मीडिया कव्हरेजपासून त्याला वाचवले जाऊ शकत नाही.. तो आमचा मुलगा आहे आणि आमच्याप्रमाणेच तो लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.