`मी माझ्या नवऱ्याच्या घरात...` मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?
Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे.
Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. गेल्या 2 दशकांपासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनानं तिच्या मानधना विषयी चर्चा केली आहे. असं म्हटलं जातं की तिला एका चित्रपटासाठी खूप जास्त मानधन मिळतं. त्याविषयी बोलताना करीना म्हणाली की तिच्यासाठी पैसे महत्त्वाचे नाही. तिनं म्हटलं की ती तिच्या नवऱ्याच्या घरात राहते आणि आजही ती स्ट्रगल करते.
'द वीक' ला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरला विचारण्यात आलं की 'ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना एका चित्रपटासाठी 10-15 कोटी मानधन मिळतं.' त्याचं उत्तर देत करीनानं सांगितलं की 'मला आशा आहे की असं झालं पाहिजे, मला देखील हेच हवं आहे. मी जे चित्रपट निवडते ते फक्त पैशांसाठी नसतात. सत्य हे आहे की जर मला कोणती भूमिका आवडते तर मी कमी पैशात देखील चित्रपट करू शकते.'
करीना कपूरनं सांगितलं की 'हे माझ्या मूडवर देखील अवलंबून आहे, हे सगळं त्यावर देखील अवलंबून असतं की चित्रपट कशावर आहे, मला कोणत्या भूमिकेसाठी विचारण्यात येत आहे. मी सध्या अशा ठिकाणी आहे, जिथे मी विचार करते की मी चित्रपटाला काय देऊ शकते. नक्कीच जर एक मोठा कमर्शियल चित्रपट असेल तर तुम्ही जे काही सांगितलं अर्थात 10-15 कोटी मानधन तर त्यासमोर ही रक्कमही कमी आहे. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. आपण बसलोय आणि मुलाखत घेतोय, तर पुढे करीना हसत बोलते की मी फक्त स्ट्रगल करत आहे.'
हेही वाचा : 'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा
दरम्यान, करीनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर करीना कपूर सगळ्यात शेवटी क्रु या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं तब्बू, क्रिती सेनन, कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ या चित्रपटांसोबत काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. आता करीना कपूर लवकरच अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय करीना लवकरच हंसल मेहता यांच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ मध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.