'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा

Anushka Sharma confessed she was arrogant : 'मी कोणाशी बोलायचे नाही अन्...', अनुष्का शर्मानं कॅमेऱ्यासमोर दिली कबूली

दिक्षा पाटील | Updated: Jul 22, 2024, 10:28 AM IST
'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा title=
(Photo Credit : Social Media)

Anushka Sharma confessed she was arrogant : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दरम्यान, खूप कमी लोकांना माहित आहे की अनुष्कानं खूप कमी लोकांसमोर हे मान्य केलं होतं की अभिनेत्री होण्याआधी ती गर्विष्ठ होती.

अनेक वर्षांपूर्वी कोयल पुरीला दिलेल्या मुलाखती दरम्यान, अनुष्का शर्माला विचारलं की तिनं आजवर कोणतं असं गर्विष्ठ व्यक्तीचं काम केलं आहे? त्यावर उत्तर देत अनुष्कानं सांगितलं की अभिनेत्री होण्याआधी ती गर्विष्ठ होती. मी शाळेत आणि इतर ठिकाणी लोकांशी जास्त बोलत नव्हते. खरंतर मी स्वत: ला वरचढ समजायचे.

अनुष्का शर्मानं पुढे सांगितलं की "मी अभिनेत्री होऊन आनंदी आहे. कारण अभिनेत्री झाल्यानंतर मला आदित्य चोप्रा यांच्याकडून रिअॅलिटी चेक मिळालं. त्यांनी सांगितलं की तू चित्रपट तर करतेस, पण तू काही सगळ्यात सुंदर दिसणारी मुलगी नाहीस. तोपर्यंत मला वाटायचं की मी सगळ्यात सुंदर मुलगी आहे. मी स्वत: ला सगळ्यात सुंदर मुलगी समजायचे, पण त्यांनी मला सांगितलं आणि मी म्हटलं अच्छा असं आहे काय."

हेही वाचा : 'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'

अनुष्का शर्मानं ‘बॅन्ड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘सुल्तान’ आणि आमिर खानच्या ‘पीके’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. अनुष्का शर्माचा अखेरचा चित्रपट हा ‘झीरो’ होता. या चित्रपटात अनुष्का ही शाहरुख खान आणि कतरिना कैफ या दोघांसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर अनुष्का शर्मा ही चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे लांब झाली. आता अनुष्का शर्मा ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.