मुंबई : आपला अभिनय, स्टाईल आणि अदा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर खान हीचा काल ३७ वा वाढदिवस होता. बेबोने तिचा वाढदिवस कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत साजरा केला. या वाढदिवसाला तिचा मुलगा तैमुर देखील असल्याने हा बर्थडे तिच्यासाठी काही खास होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिनाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये करण जोहर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा, कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांनी उपस्थिती लावली. अमृताने या पार्टीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.





त्यापैकी एका फोटोला तिने ‘हॅप्पी हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग बेबो’, असे कॅप्शन दिले आहे. 




करणने करिनासोबतचा फोटो शेअर करत ‘बर्थडे गर्ल’ असं लिहिलंय. तसेच, ‘की अॅण्ड का… मी या दोघांमधील ‘अॅण्ड’ आहे’, असे कॅप्शन त्याने बेबो आणि अर्जुनसोबतच्या फोटोलो दिलेय.



मातृत्वाची जबाबदारी सांभाळत करिना कपूर खान सध्या बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. रीया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात ती काम करत असून, वाढदिवसासाठी तिने चित्रीकरणातून दोन दिवसाची सुट्टी घेतली होती.