सैफ-करिनाचा रोमँन्टिक अंदाज कॅमेरात कैद; फोटो पाहून व्हाल थक्क
करीना कपूर खान सोशल मीडियावर काही ना काही फोटो शेअर करत असते.
मुंबई : पतौडी घराण्याची बेगम करीना कपूर खान सोशल मीडियावर काही ना काही फोटो शेअर करत असते. अभिनेत्री कधी तैमूर आणि जेह सोबतचे फोटो शेअर करते तर कधी सैफसोबतचे कोझी फोटो. त्याचबरोबर, सैफ अली खानसोबत बीचवर किस करताना करीनाने असा एक फोटो शेअर केला आहे. जो इंटरनेटचा पारा चढवत आहे. करिनाचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येकजण या स्टार्सच्या सेल्फीवर जोरदार कमेंट करत आहे.
बीच सेल्फी
करीना कपूर खानने सोशल मीडियावर सैफसोबत जो फोटो शेअर केला आहे तो फोटो बीचवरचा आहे. फोटोमध्ये करीना कपूर मेकअपशिवाय दिसत आहे. करिनाने एकत्र तीन फोटो शेअर केले आहेत ज्यात हे दोन स्टार्स बीचवर आरामात दिसत होते.
सैफने किस केलं
या फोटोमध्ये करीना कपूर खान आणि सैफ अली खानने जॅकेट घातलेलं दिसत आहे. दोघंही अतिशय हलक्या मूडमध्ये दिसले. या फोटोमध्ये करीना सेल्फी घेताना दिसत आहे, तर सैफ अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे.
मेकअपशिवाय फोटो शेअर केला
खास बाब म्हणजे करिनाने तीन फोटोंपैकी एक विदाऊट मेकअप फोटोही शेअर केला आहे. अभिनेत्रीने अगदी जवळून सेल्फी घेतला आहे ज्यात ती मेकअपशिवाय दिसत आहे. जो पाहताच व्हायरल झाला आहे.