मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्या हातात चक्क फावडा घेण्याची वेळ आली आहे. फावडा घेवून ती जमीन खोदताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे काम तिला आनंद देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोणाचीही मदत न घेता ती हे काम मोठ्या उत्साहाने करत आहे. परंतु हे काम ती कशासाठी करत आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे. व्हायरल व्हिडिओ सोबतच एक फोटो देखील चाहत्यांचं मन आकर्षुन घेत आहे.  



करिना लवकरच अभिनेता अक्षय कुमार सोबत 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची शूटींग देखील पूर्ण झाली आहे. मोठ्या कालावधी नंतर हे दोन कलाकार पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता इरफार खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.