मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या प्रोफेशनल लाइफ ते अगदी पर्सनल लाईफपर्यंतच्या सगळ्या खास गोष्टी सनीच्या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे. सनीचं आयुष्य हे खूप खडतर आहे. या बायोपिकचा प्रवास खूप वेगळा आणि हटके होता. हाच प्रवास सनीने आपल्या 'करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी' या वेब सिरीजमधून मांडला आहे. ही वेब सिरीज zee 5 वर प्रसारित करण्यात आली आहे. बहुदा हा पहिला प्रयत्न आहे जिथे कलाकार स्वतः आपल्या बायोपिकमध्ये काम करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी म्हणते की, या वेब सिरीजमध्ये माझ्या आयुष्यातील सगळ्या पैलू मांडल्या आहेत. तसेच सनीला हा प्रश्न आहे की, यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशी असेल. सनी म्हणते की, मी हे कॅरेक्टर प्ले करताना मी मनापासून केलं आहे. या वेब सिरीजमध्ये दिग्दर्शक आदित्य दत्त म्हणतात की, मी देखील इतर निर्मात्याप्रमाणेच विचारत आहे. कारण मला देखील इतर निर्मात्यांप्रमाणेच काळजी आणि टेन्शन होतं. ही वेबसिरीज ऑनलाईन zee 5 वर लाँच झाली असून प्रेक्षकांना ती पाहता येणार आहे. 



गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर सनीच्या बायोपिकचा टीझर लाँच झालं आहे. टीझरमध्ये सनीने, माझं आयुष्य हे लवकरच एक पुस्तकं असणार आहे अशी प्रतिक्रिया दिला. सनीच्या जीवन संघर्षाची कहाणी या बायोपिकमध्ये आहे. या वेब सिरिजमध्ये तुम्हाला सनीच्या पूर्व आयुष्याबद्दल देखील कळणार आहे.