VIDEO : `करिश्मा का करिश्मा` फेम अभिनेत्री झनक शुक्ला अडकली लग्न बंधनात
Karishma Ka Karishma Jhanak Shukla Got Married : `करिश्मा का करिश्मा` या मालिकेतून सगळ्यांच्या मनात घर करणारी झनक शुक्लानं घेतल्या सप्तपदी
Karishma Ka Karishma Jhanak Shukla Got Married : 90 च्या दशकातील गाजलेली मालिक्यांपैकी एक म्हणजे 'करिश्मा का करिश्मा' आहे. तर याच शोमधून लोकप्रियता मिळवलेली बालकलाकार आणि लाइफस्टाइल ब्लॉगर म्हणून झनक शुक्लाला ओळख मिळाली. झनक शुक्ला ही लग्न बंधनात अडकली आहे. शुक्ला ही स्वप्निल सूर्यवंशीसोबत लग्न बंधनात अडकली आहे. त्यांनी रोका झाल्यानंतर 7 जानेवारीला 2023 ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपला अधिकृत केलं होतं. इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिचं लग्न आहे.
झनक तिच्या क्यूटनेससाठी 90 च्या दशकांमध्ये मुलांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिला खरी लोकप्रियता ही 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेमुळे मिळाली होती. याशिवाय तिनं 'कल हो ना हो' आणि हॉलिवूडच्या 'वन नाइट विद द किंग' या चित्रपटात देखील काम केलं होतं. झनकनं आता तिच्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड स्वप्निल सूर्यवंशीसोबत लग्न केलं आहे.
झनकनं तिच्या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. झनकनं लाला रंगाची साडी नेसली आहे. स्वप्निलनं आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. झनकनं तिचा लूक सिंपल ठेवला आहे.
झनक ही 15 वर्षांची असताना तिनं लाइमलाइटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की 'करिश्मा का करिश्मा' मधून मिळालेल्या यशानंतर 'कल हो ना हो' आणि 'वन नाइट विद द किंग' मध्ये काम केलं. खरंतर, तिनं तिच्या करिअर पेक्षा अभ्यासाला जास्त महत्त्व देण्याचं ठरवलं.
हेही वाचा : लग्नाच्या 12 वर्षांनंतर 39 व्या वर्षी राधिका आपटे झाली आई; Breastfeeding चा फोटो केला शेअर
पुढचं शिक्षण करत असताना तिला तिचं प्रेम देखील मिळालं. अभिनेत्री होण्याचं तिचं लहानपणापासून स्वप्न असलं तरी ती मोठी झाल्यानंतर तिनं इंडस्ट्रीत न येण्याचा निर्णय घेतला. आता झनकनं साबन बनवण्याचा बिझनेस सुरु केला आहे. जर तिचा बिझनेस मोठा झाला तर ती पुढे नॉर्थला स्थानिक होण्याचा विचार करते.