Radhika Apte Breastfeeding Photo : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या 12 वर्षांनंतर 39 व्या वर्षी आई झाली आहे. त्यामुळे राधिकाचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे. राधिकानं लेकीला जन्म दिल्याच्या एक आठवड्यानंतर ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. खरंतर, स्वत: राधिकानं हे देखील सांगितलं की तिनं मुलीला जन्म दिला आहे. राधिकानं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
राधिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती लॅपटॉपवर काम करत असल्याचं दिसत आहे. तर त्यासोबत ती तिच्या मुलीला स्तनपान करताना दिसत आहे. राधिकाच्या या पोस्टवर नेटकरी विविध कमेंट करत असल्याचे दिसत आहेत. तर अनेकांना राधिकाला तिच्या आई झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटोत राधिकाच्या लेकीचा थोडा चेहरा दिसतोय आणि चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. राधिकानं हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की 'बाळ झाल्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग. बाळ एका आठवड्याचं झालं आहे आण ब्रेस्टफीड करत आहे.'
दरम्यान, नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं जेव्हा राधिका आपटे ही बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये आली होती. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी पहिल्यांदा सगळ्यांनी तिचं बेबी बंप पाहिलं होतं. त्यावेळी तिनं नवरा बेनेडिक्ट टेलरसोबत तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांचा आनंद हा गगना मावेना असा झाला होता. राधिकानं ज्या प्रकारे तिच्या प्रेग्नंसीला सीक्रेट ठेवलं. त्याच प्रमाणे डिलिव्हरी आणि बाळाचं जेंडर काय आहे हे गुपीत ठेवलं होतं.
हेही वाचा : राजेश खन्ना यांच्या 'या' दोन चित्रपटांमध्ये शर्मिला टागोर होत्या प्रेग्नंट; सैफ आणि सोहाला देणार होत्या जन्म
या आधी राधिका आपटेनं 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आधी त्यांचा असा काही ठरवलं नव्हतं की प्रेग्नंसीची अधिकृत घोषणा करायची आहे किंवा नाही. त्यांना हे प्रायव्हेट ठेवायचं होतं. राधिकानं हे देखील सांगितलं की प्रेग्नंट असल्याचं कळल्यानंतर तिला दोन आठवडे काही कळलं नाही, म्हणजे त्यांना कळतच नव्हतं काय करायचं. कारण तिनं किंवा तिच्या नवऱ्यानं बाळाविषयी काही प्लॅनिंग केली नव्हती.