मुंबई : बॉलिवूडची ही झगमगत्या दुनियेत  असे अनेक सत्य आहेत, जे अद्याप त्यांच्या चाहत्यांना माहिती नाहीत. बॉलिवूड स्टार कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्तेत असतात. कधी चित्रपटांमुळे कधी अफेअर्समुळे तर कधी मैत्री आणि शत्रूत्वामुळे. आपल्या सुंदर अदांनी चाहत्यांना घायाळ करणऱ्या अभिनेत्री करिष्मा कपूर आणि रविना टंडन ऐकेकाळी एकमेकांचं तोडं देखील पाहात नव्हत्या. तर नक्की त्यांच्या भांडणामागे कोणत करण होत जाणून घेवू. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


90च्या दशकातील अभिनेत्री करिष्मा आणि रवीना यांच्यात प्रचंड मोठं भांडण झालं. तेव्हा या दोघींमधील कॅट फाईट तुफान चर्चेत देखील आली. आताचं सांगायचं झालं तर दोघींमधील संबंध आता चांगले आहेत. पण ऐकेकाळी दोघींमध्ये जबर हाणामारी झाली होती. दोघींच्या भांडणाचं सत्य कोरिओग्राफर फराह खानने स्वतः 2007 मध्ये 'कॉफी विथ करण' मध्ये उघड केले होते.



फराहने करण जोहरच्या शोमध्ये त्यांच्या कॅट फाईटबद्दल सांगितले होते. जेव्हा दोघी 'आतीश: फील द फायर' चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. शूटिंग दरम्यान दोघींमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाला आणि नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. फराह खानने सांगितले होते की, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन मुलांप्रमाणे भांडत होत्या.