Karishma Kapoor Marriage : अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे ९० दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 साली करिश्माने बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. मात्र सध्या करिश्मा सिनेसृष्टीपासून लांब आहे. तिचं फॅमेली बॅगग्राऊंड बॉलिवूडचं असूनही तिला सिनेमा मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल कारावा लागला. होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिश्माने फिल्मी करिअरसाठी तिचं शिक्षण सोडलं होतं. अभिनेत्रीने वयाच्या १५ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिने तिचा मेकओव्हरही केला होता. अभिनयात पदार्पण करण्याआधी करिश्माला लोकं मुलगा म्हणायचे. तिला मुलांसारखं रहायला आवडायचं. पण 'राजा हिंदुस्तानी'मध्ये तिचा मेकओव्हर केला. आणि त्यानंतर अभिनेत्रीने स्वत:ला खूप सुंदर कॅरी करायला सुरुवात केलं. 


मात्र आलियाच्या लग्नावेळी करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा अचानक होऊ लागली होती. यामगच कारण म्हणजे करिश्माचा एक फोटो. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  
यामध्ये करिश्माच्या अंगावर कलिरा पडल्या. अशी प्रथा आहे की, लग्नात ज्याच्या अंगावर कलिरा पडतात त्याचं लवकरच लग्न होतं. या प्रथेप्रमाणे करिश्माच्या अगांवर कलिरा पडल्यावर तिच्या लग्नाची चर्चा जोरदार होवू लागली. 


आलियाच्या लग्नातील हे फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले होते.  या फोटोंमधील करिश्माचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. ही प्रथा पंजाबी लोकांमध्ये आहे. नववधू बहिणीच्या डोक्यावर  आपलं मनगड जोर-जोरात आपटते मग जिच्या डोक्यावर कलिरा पडतात त्याचं लग्न होत अशी प्रथा मानली जाते. कलिरा पडणं हे लग्न होण्याचं लक्षण आहे.



गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे. कधी फोटोंमुळे तर कधी अन्य कारणांमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरते. करिश्मा कपूरनं दिल्लीचे उद्योगपती असलेल्या संजय कपूरबरोबर लग्न केलं होतं, पण दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजयला दोन मुली आहेत.  अभिनेत्री करिश्मा कपूरनेही पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला आहे. करिश्माच्या लग्नाच्या चर्चेने तिचे चाहते मात्र खूश होते मात्र करिश्माने या सगळ्या चर्चांवर मौन सोडणंच योग्य मानलं आहे.