मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे. कधी फोटोंमुळे तर कधी अन्य कारणांमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरते. यावेळी मात्र वेगळ्याच कारणासाठी करिश्माची चर्चा होत आहे. करिश्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे.  करिश्माने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ती जोरदार चर्चेत आली आहे. हा फोटो जुन्या आठवणींनी पुन्हा ताज्या करेल असा आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये करिश्मा अभिनेता सलमान खान आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यासोबत दिसत  आहे. हा फोटो 'अंदाज अपना अपना' चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा आहे. आज सचिन तेंडूलकरचा वाढदिवस असल्यामुळे करिश्माने हा जुना फोटो पोस्ट केला आहे. 


पण करिश्माने पोस्ट केलेल्या फोटोमुळे सलमानला मात्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका युजरने म्हणलं, की तेव्हा ही सलमानचा ड्रेसिंस सेंस चांगला नव्हता आणि आजही नाही.  सलमानने जी पॅन्ट घातली आहे, त्यामुळे नेटकरी त्याची खिल्ली उडवत आहेत. सांगायचं  झालं तर  सलमानने कंबरेत ढगळ पॅन्ट जी घातली आहे...तिला बॅगी पॅन्ट म्हणायचे.