मुंबई : 'पद्मावती' हा यंदाचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्पावधीतच रसिकांनी या ट्रेलरचा उत्तम प्रतिसाद दिला. पण त्यासोबतच समाजातील काही घटकांचा या चित्रपटाला विरोध आहे.  
पद्मावतीच्या शुटींग दरम्यानही काही समाजाने विरोध केला होता. आता करणी सेनेने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. पद्मावती सिनेमा आम्हांला दाखवल्याशिवाज सिनेमागृहात लावला जाऊ नये अन्यथा होणार्‍या नुकसानाला आम्ही जबाबदार राहणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.


करणी सेनेने पीव्हीआरलादेखील यासंबंधी पत्र लिहल्याची माहिती नवभारत टाईम्समध्ये लिहलेल्या एका बातमीमध्ये लिहण्यात आले आहे. 


पद्मावती चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेमध्ये तर शाहीद कपूर राजा रतन सिंग आणि रणवीर सिंग अल्लाउद्दीज खल्जीच्या भूमिकेत आहे.  संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.