मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. नुकताच प्रदर्शित झालेला त्याचा 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 250 कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यानंतर तिने आपली फी वाढवल्याच्या बातम्या समोर आल्या. ज्यावर त्याने मौन सोडलं आहे. याविषयी  काही बोलला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक आर्यन एका चित्रपटासाठी 15-20 कोटी रुपये घेतो, पण आता तो एका चित्रपटासाठी 35-40 कोटी रुपये घेणार असल्याची बातमी होती. वास्तविक, ट्विटरवर एक बातमी शेअर करताना कार्तिकने लिहिलं की, 'प्रमोशन झालं आहे, इन्क्रीमेंट नाही..'


पुढे तो म्हणाला की, 'चित्रपटाची कमाई ही अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळातील यशामुळे होत आहे. त्यामुळे प्रत्येकाची फी वाढवण्यात काही गैर नाही पण जेव्हा त्याचं वजन चित्रपटावर पडतं. हे चुकीचं आहे. या विधानानंतर चाहते कार्तिकचं कौतुक करताना थकत नाहीयेत. कार्तिकबद्दल बोलताना निर्माता भूषण कुमार म्हणाले की, त्याने चित्रपटासाठी खूप आर्थिक मदत केली आहे.


कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'शेहजादा' या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे. ही जोडी अनेकदा एकत्र दिसली आहे. आणि आता चाहते दोघांनाही पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिकचा चित्रपट हा तेलगू चित्रपट अला वैकुंठापुरमुलूचा रिमेक आहे आणि त्यात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन सोबत मनीषा कोईराला आणि परेश रावल देखील दिसणार आहेत.