What is the meaning of Pasoori: बॉलिवूडमध्ये सध्या प्रसिद्ध गाण्यांना नव्याने रिक्रिएट करण्याचा ट्रेंड सुरु आहे. 'हम्मा हम्मा', 'भुल भुलैय्या', 'हायला रे हायला', 'आँख मारे', 'टिप टिप बरसा पानी' अशी अनेक गाणी गेल्या काही चित्रपटांमध्ये रिक्रिएट करण्यात आली आहेत. या ट्रेंडमध्ये आता आणखी एका गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. कार्तिक आर्यन (Karthik Aryan) आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' (Satya Prem Ki Katha) चित्रपटातील 'पसूरी' हे नवं गाणं समोर आलं आहे. दरम्यान, यानंतर सोशल मीडियावर (Social Media) #Pasoori ट्रेंड होऊ लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पसूरी' (Pasoori) हे मूळचं पाकिस्तानी गाणं आहे. अली सेठी (Ali Sethi) याने हे गाणं गायलं असून आता चित्रपटाच्या माध्यमातून ते नव्या रुपात समोर आणलं जात आहे. हे गाणं रिलीज करण्यात आला असून यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 


कोक स्टुडिओच्या सीझन 14 मध्ये सहभागी करण्यात आलेल्या या ओरिजनल गाण्याला प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. पण तुम्हाला 'पसूरी' या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? जाणून घ्या या शब्दाचा अर्थ आणि हे गाणं तयार होण्यामागचा किस्सा...



पाकिस्ताना गायक अली सेठीने (Pakistani singer Ali Sethi) शाए गिल (Shae Gill) सह ‘पसूरी’ गाणं गायलं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर ट्रेंड झालं होतं. हे गाणं सुपरिहट झालं आणि यावर अनेक रिल्सदेखील करण्यात आल्या. दरम्यान यानिमित्ताने 'पसूरी' शब्दाचा अर्थ समजून घ्या.


'पसूरी'चा अर्थ काय?


'पसूरी' हा मुळात पंजाबी भाषेतील शब्द आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये 'पसुरी'चे दोन अर्थ आहेत, एक 'संकोच किंवा कठीण' आणि दुसरा 'घाई किंवा उत्सुक'.


असं तयार झालं 'पसूरी' गाणं


पसूरी गाणं तयार होण्याचा किस्सा फार रंजक आहे. अली सेठीने एका मुलाखतीत प्रवासादरम्यान आपल्याला हे गाणं सुचल्याचा खुलासा केला होता. त्याने सांगितलं होतं की, मी एकदा कारने फैसलाबाद येथून लाहोरला जात होतो. यावेळी माझ्या कारसमोर जाणाऱ्या ट्रकमुळे मला या गाण्याची कल्पना सुचली. ट्रकच्या मागे लिहिलं होतं की, ‘आग लावां तेरी मजबूरी नुं’. 



अली सेठीला ही ओळ फारच आवडली आणि त्याने आपल्या गाण्यात तिला समाविष्ट करुन घेतलं. अली सेठीने या ओळीच्या पुढे ‘आन जान दी पसूरी नुं’ याची जोड दिली. याचा अर्थ होतो 'अडचणी येत जात राहतील'. अली सेठीला असं गाणं हवं होतं जे क्लासिकलसह कंटेम्पररीदेखील असेल. 


पसूरी हे पाकिस्तान आणि कोक स्टुडिओचं (Coke Studio Pakistan) पहिलं गाणं ठरलं होतं, ज्याने स्पॉटीफाय च्या ‘व्हायरल 50 ग्लोबल’ चार्टमध्ये जागा मिळवली होती.