Kartik Aryan Kiara Advani Oops Moment: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या चर्चेत आहेत. त्यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटासाठी गर्दी केली आहे. मागच्या वर्षी 'भुलभुलैया 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात पहिल्यांदा अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची जोडी समोर आली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यांच्या केमेट्रीचेही प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्याची कोण उत्सुकता निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दोघंही स्पॉट झाले असताना कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये कार्तिक कियाराला आपला ड्रेस सांभाळण्यासाठी सांगतो आहे. त्यामुळे त्यांच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी कार्तिननं कियाराला उप्स मुमेंटपासून वाचवलं आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 


तुम्ही या व्हीडिओमध्ये पाहू शकता की कियारा अडवाणी यावेळी सुंदर अशा रेडीश ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. तिनं यावेळी ऑफ शोल्डर असा ड्रेसचा लुक कॅरी केला होता. यावेळी कार्तिक आर्यन कियाराच्या समोर उभा राहून तिला काहीतरी सांगत होता. तेवढ्यात कियारानं आपला ड्रेस सांभाळला. यावेळी ती आपला ड्रेस सांभाळत दिसत असल्यानं नेटकऱ्यांनी नानाविध तर्क लावायला सुरूवात केली. जेव्हा कियारानं आपला ड्रेस नीट केला त्यानंतर कार्तिक तिच्यासमोरून बाजूला झाला. त्यानंतर लगेचच ती पापाराझींसमोर पोझेज द्यायला सुरूवात करते. 


हेही वाचा - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सत्य समोर येणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा


यावेळी कार्तिक आर्यनवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याला अनेकांनी जेन्टंलमन असं म्हटलं आहे. सध्या या व्हिडीओखाली अनेक जण नानातऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहे. त्यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या ट्रेलर चाहत्यांनी तूफान लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. त्यामुळे त्याची फारच चर्चा रंगली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाचा ट्रेलर तर मिनिटात व्हायरल झाला आहे. या चित्रपटातून मराठी चित्रपटाचे लोकप्रिय दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगली आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.