Sushant Singh Rajput Case: गेली तीन वर्षे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचे विविध कांगोरे समोर येत आहेत. 14 जून 2020 रोजी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं बांद्राच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर बॉलिवूडचे चित्रच पालटले. इतक्या मोठ्या आणि यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्यानं अचानक मृत्यूचे टोक गाठवं हे चित्र त्याच्या चाहत्यांना हेलावून टाकणारं होतं. त्यानंतर सीबीआयनं या घटनेकडे अगदी गांभीर्यानं पाहत या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला असून आता याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एक मोठी अपडेट समोर आणली आहे. गेल्या तीन वर्षांत या प्रकरणानं अनेक वळणं घेतली आहेत आता यापुढे हे प्रकरण कसे पुढे जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
'रिपब्लिक' या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ''यापुर्वी जी माहिती या केसच्या संदर्भात उपलब्ध होती ती ऐकीव माहितीच्या आधारे समोर आली होती. त्यानंतर काही लोकांनी असेही सांगितले की या केसच्या संदर्भात त्यांच्याजवळ ठोस पुरावेही आहेत. आम्ही त्या लोकांशी बोलणी केली असून आता आम्ही ते सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. तरीही जेवढे पुरावे सध्या उपलब्ध आहेत त्यानूसार त्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे की ते पुरावे खरे आहेत की खोटे. या पुराव्यांची पडताळणी सुरू असल्यानं आता मी यावर काही बोलणं योग्य होणार नाही.''
देवेंद्र फडणवीसांच्या या मुलाखतीनंतर या केसचे पुढे काय होणार याबद्दल कदाचित आणखीनं माहिती मिळू शकेल परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून यासंदर्भातील पुरावेही ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडून ते पोलिसांपर्यंत पोहचवण्यास सांगितले आहेत.
हेही वाचा - ''तिनं मागे वळून पाहताच...'', अशोक सराफ - निवेदिता यांच्या प्रेमाचा 'तो' किस्सा अखेर जगासमोर
अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा बॉलिवूडचा अत्यंत लोकप्रिय कलाकार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर या प्रकरणाचे अनेक कांगोरे समोर आले होते. अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नावं या प्रकरणातून समोर आले होते. त्यानंतर अनेकांची नावंही या प्रकरणातून समोर आलेली होती. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळणं मिळाले. सुशांतच्या केसनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणही बाहेर आले होते. त्यामुळे हा काळ बॉलिवूडसाठी अटीतटीचा होता. अनेकांनी यादरम्यान बॉलिवूडवर टीका केली. बॉलिवूडमध्ये घराणेशाही चालते आणि त्यामुळे सुशांतवरही अन्याय झाल्याचे बोलले गेले होते. सुशांतचा 'दिल बिचारा' हा शेवटच्या चित्रपट त्याचवर्षी जूलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.