कार्तिक साराला पत्नी म्हणून निवडतो तेव्हा...
सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या जोमात करत आहे. चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि आनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारलेला आहे. भूमी चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे, तर अनन्या त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेला न्याय देणार आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्याने अभिनेत्री सारा अली खानची निवड पत्नी म्हणून केली.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यनला विचारण्यात आलं की, सारा अली खान, कियारा आडवाणी, नुसरत भरूचा आणि तारा सुतारिया यांपैकी पत्नी म्हणून कोणाची पत्नी म्हणून निवड करशील. तेव्हा त्याने कियाराची निवड पत्नी म्हणून केली आणि ताराची निवड प्रेयसी म्हणून केली.
त्यानंतर, नुसरत भारूचाची पत्नी म्हणून निवड केली तर साराची निवड प्रेयसी म्हणून करशील का? या प्रश्नाला नकार देत त्याने सारा आणि कियाराला पत्नी तर तारा आणि नुसरतची निवड प्रेयसी म्हणून करेल असे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सारा आणि कार्तिकच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. परंतु आता त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आहे. सारा आणि कार्तिक लवकरच 'लव आज कल' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.