मुंबई | सारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं सीजन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सीजनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इतिहास घडवणारे पंचरत्न परिक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करणार आहेत. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे, पण कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांनी देखील मुलीच्या यशाचं कौतुक केलंय.



लिटील चॅम्प्सची विजेती कार्तिकीला परीक्षकाच्या खुर्चीवर पाहून त्यांना अगदी गहिवरुन आल्याचे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. जुन्या आठवणींना उजाळा देत लहान असताना कार्तिकीने सारेगमपचे विजेतेपद पटकावण्यासाठी कशी मेहनत घेतली याचा ही उल्लेख पोस्टमध्ये केलाये. शिक्षण आणि गाण्याची आवड या दोन्ही गोष्टी कार्तिकीने अगदी उत्तम रित्या सांभाळत यशाचं डोंगर गाठल्याचं कार्तिकीच्या बाबांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.


कार्तिकने मागील वर्षी इंजिनियर रोनित पिसेसोबत विवाहगाठ बांधली आणि पिसेंच्या घरात पाऊल ठेवत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. पण  कार्तिकी अगदी उत्तम रित्या सासर आणि माहेरच्या मंडळींचे सगळे लाड पुरवताना दिसते. सोबतच आपली गायनाची आवड जपत यशस्वी प्रवास करताना दिसतेय.