मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खानच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरत आहे. 'कॉफी विथ करण'च्या शोच्या मध्ये साराने त्याच्या सोबत कॉफी पिण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कार्तिकनेही तिच्या सोबत कॉफी पिण्यासाठी होकार दिला. त्यांच्या या कॉफी डेटनंतर त्यांनी एकत्र चित्रपटात देखील काम केलं. तेव्हा कार्तिकचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. कार्तिकचं दुसरं स्वप्न देखील लवकरच पूर्ण होणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, कार्तिक लवकरच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला आहे. तो लवकरच बिग बींसोबत एक जाहिरातीसाठी काम करणार आहे. 


त्याचं दुसरं स्वप्न पुर्ण होणार असल्याचे कळताचं त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. कार्तिक सध्या 'पती पत्नी और वो' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. विवाहबाह्य संबंधांवर आधारित हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. कार्तिक शिवाय चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिका साकारणार आहे.