मुंबई : करवा चौथ आणि हिंदी चित्रपट जगताचं वेगळं नातं आहे. फक्त चित्रपटसृष्टीच नव्हे तर बॉलिवूडमधील कलाकारही या सणाला मोठ्या उत्साहात साजरा करतात. सोशल मीडियावरही याची धूम पाहाय़ला मिळते. पण, कपूर कुटुंबातील एक व्यक्ती मात्र या साऱ्याला अपवाद ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थेट सोशल मीडियाच्याच आधारे एक पोस्ट शेअर करत या व्यक्तीनं आपण करवा चौथ वगैरे साजरा करण्यास अजिबातच उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तिच्या या पोस्टमुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  


ही व्यक्ती म्हणजे अनिल कपूर यांची मुलगी रिया. ऑगस्ट महिन्यामध्येच रिया विवाहबंधनात अडकली. करण बूलानी याच्याशी तिनं लगाठ बांधली आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. याच प्रवासात एक असा टप्पा सध्या आला आहे, जिथं रियानं अतिशय महत्त्वाची गोष्ट सर्वांसमोर स्वीकारली. 


Hi. Happy Sunday... असं लिहित रियानं पुढे म्हटलं, 'आदरपूर्वक सांगते, कृपया माझ्याकडे करवा चौथच्या कोलॅबरेशनसाठी येऊ नका. ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर करण आणि माझा विश्वास नाही. जोडीदार म्हणून हा सण साजरा करणाऱ्यांचा आम्ही आदर करतो.' 


रियाची ही पोस्ट सर्वांच्याच नजरा वळवून गेली. नातं जपण्यासाठी त्यावर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करण्याची गरज नसल्याचीच भावना रियाच्या या पोस्टमधून पाहायला मिळाली. 




2018 मध्ये रिया आणि करणचं नातं सर्वांसमोर आलं होतं. सोनम कपूरच्या विवाहसोहळ्याच्या वेळी रिया आणि करणच्या अफेअरनंही सर्वांनाच थक्क केलं. सोशल मीडियावरही रिया करणसोबतचे अनेत फोटो पोस्ट करत असते. ज्या माध्यमातून करणसोबतचं तिचं घट्ट नातं एक आदर्श प्रस्थापित करुन जातं.