Urvashi Dholakia Car Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या (Urvashi Dholakia) कारचा अपघात झाला आहे. या अपघतात उर्वशी थोडक्यात वाचली आहे. शनिवारी उर्वशी ही मीरा रोडवर असलेल्या फिल्म स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी जात होती. (Urvashi Dholakia Accident)  त्या दरम्यानच तिचा हा अपघात झाला आहे. यावेळी उर्वशीच्या गाडीला मागून एका शाळेच्या बसनं मागून धडक दिली. हा अपघात काशिमिरा येथे झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्वशीच्या गाडीचा हा अपघात जोरदार होता असे म्हटले जाते. मात्र, उर्वशीसोबत तिचा स्टाफ देखील थोडक्यात बजावलं आहे. दरम्यान, उर्वशीनं शाळेच्या बसचालकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला नाही. त्यावर उर्वशी म्हणाली की हा फक्त एक अपघात होता. तर उर्वशीला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही. 



उर्वशीला खरी प्रसिद्धी ही तिच्या खलनायीकेच्या भूमिकेतून मिळाली आहे. उर्वशीनं 'कसौटी जिंदगी की' (Kasautii Zindagi Kay) या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील 'कोमोलिका'च्या (Komolika Basu) नावानं उर्वशीला आजही लोक ओळखतात. त्यानंतर उर्वशी  'नागिन 6' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसली होती.


उर्वशी केवळ तिच्या कामामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. उर्वशीचे वयाच्या 16 व्या वर्षी तिचे लग्न झाल्याचा खुलासा केला होता. तर वयाच्या 17 व्या वर्षी उर्वशीनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. उर्वशीच्या मुलांचे नाव सागर आणि क्षितिज असे आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतरच उर्वशी पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर उर्वशीने लग्न केले नाही, इतकंच काय तर दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. (Urvashi Dholakia Twin Son's)


हेही वाचा : विवाहित असूनही 'हे' कलाकार दुसऱ्या व्यक्तीवर भाळले....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


दरम्यान, कधी काळी उर्वशीचे नाव अभिनेता अनुज सचदेवासोबत जोडले गेले. दोघांनीही काही काळ एकमेकांना डेट केले, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. उर्वशीही अनुजसोबत 'नच बलिए'मध्ये दिसली होती. यानंतर उर्वशीचे नाव एका उद्योगपतीसोबतही जोडले गेले, पण एका मुलाखतीत उर्वशीनं ही फक्त एक अफवा असल्याचे म्हटले होते