मुंबई : महाराष्ट्रात सध्या वारकऱ्यांचा वारी तुफान चर्चेत आहे. वारीचे अनेक फोटो आणि व्हिडीओसध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण या वारीमुळे भक्तमय झालं आहे. दोन वर्षांनंतर वारी निघाल्यामुळे मोठ्या संख्येनं वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांमध्ये कलाकारांचा देखील समावेश आहे. यंदाच्या वारीला प्रसिद्ध अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी देखील गेली आहे. अभिनेत्री तिथे वारकऱ्यांची सेवा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कश्मिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहे.  सोशल मीडियावर अभिनेत्रीची बरीच चर्चा होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'पंढरीची वारी, वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो. अशाच एका वारीचा अनुभव'


कश्मिराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2009 साली ‘शुचिकृत्य’ या फाउंडेशनची स्थापना केली . फाउंडेशन अंतर्गत वारकऱ्यांना औषधं, अन्नदान, मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जातात. सध्या कश्मिराच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.