Kashmira Shah trolled in no makeup look :  बॉलिवूड स्टार्ससाठी मेकअप किती महत्त्वाचा आहे हे सर्वांनाच माहित आहे. मात्र अनेकवेळा काही स्टार्स कधी-कधी मेकअपशिवाय स्पॉट होतात, त्यावेळी त्यांना पाहून चाहतेही आश्चर्यचकित होतात. अशीच एक अभिनेत्री विदाऊट मेकअपमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता, प्रसिद्ध कॉमेडिअन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाह आहे. कश्मिराने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. मात्र तिला विनामेकअपचं पाहून नेटकऱ्यांनी तिला इतकं ट्रोल करत आहे की तीसुद्धा असा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी 100 वेळा विचार करेल.


कश्मिराने मेकअप दरम्यान एक इन्स्टा लाइव्ह केलं होतं, त्यानंतर तिने व्हिडीओ शेअर केला. कश्मिराची मेकअप प्रोसेस काय आहे हे सर्वांना सांगितले. तिने मेकअप आर्टिस्टसोबतच तिच्या हेअरस्टायलिस्टचीही सर्वांना ओळख करून दिली. पण लोक त्याची चेष्टा करू लागले. दरम्यान, कृष्णाही काश्मिराच्या मागून आला आणि तिच्या मेकअपसाठी किती पैसे लागतील, असं विचारू लागला.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)


कश्मिराचा नो मेकअप लूक पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, 'स्वप्न पाहिलं, या रूपात कृष्णाही घाबरेल'. एकाने लिहिलं की, तुम्ही मेकअपशिवाय चंकी पांडेसारखं दिसत आहात. 'लहान मुलांना का घाबरवत आहात', असे सांगितले. एका यूजरने लिहिले की, 'कृष्णा फसला'.


याआधीही कश्मिरा ट्रोल झाली होती त्यावेळी तिने बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या चित्रपट निर्माता साजिद खानला सपोर्ट केला होता. साजिद खानवर आतापर्यंत 9 पेक्षा जास्त मुलींनी MeToo चे आरोप केले आहेत.