मुंबई : मागच्या काही काळापासून अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या विवाहसोहळ्यामध्ये चाहते कमालीची उत्सुकता दाखवू लागले आहेत. विकी आणि कतरिनाचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपेलेलं असतानाच आता एक अशी बातमी समोर आली आले, जी सर्वांनाच चिंतेत टाकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हटलं जातंय की, विकी आणि कतरिना मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 


जवळपास दोन वर्षांच्या नात्यानंतर या जोडीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Katrina kaif Vicky kaushal)


त्यांच्या लग्नाच्या चर्चांना जोरदार हवा त्यावेळी मिळाली, जेव्हा विकी- कतरिनाचा रोका झाल्याची माहिती समोर आली. 


बॉलिवूडच्या या दोन्ही सेलिब्रिटींनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण, मुळात या दोघांमध्येही रोकाची माहिती लीक झाल्यामुळं कडाक्याचं भांडण झालं होतं. 


सूत्रांच्या माहितीनुसार कोणाच्या टीमकडून मीडियापर्यंत ही माहिती मिळाली याच मुद्द्यावरुन त्यांच्यात मतभेद झाले होते. 


हा वाद मिटला, दोघंगी लग्नाच्या तयारीलाही लागले; पण, वादाची चर्चा मात्र आता रंगू लागली आहे. 


विकीनं या साऱ्यासाठी फोटोग्राफर्सना दोषी ठरवलं होतं. 


एकिकडे विकी आणि कतरिनानं त्यांचं नातं शक्य त्या सर्व पद्धतींनी लपवण्याचा प्रयत्न केला होता. पण, दुसरीकडे मात्र या जोडीच्या प्रत्येक हालचालीवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. 


अभिनेता हर्षवर्धन कपूर यानंही एका मुलाखतीमध्ये विती- कॅटच्या नात्यावर वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं.