मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल बऱ्याच काळापासून माध्यमांसोबत लपाछपी खेळत आहेत. दोघांनाही अनेकवेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. परंतु आतापर्यंत कतरिना आणि विकी दोघांनीही त्यांच्या नात्याची घोषणा केली नाही. अलीकडेच हे कपल 'शेरशाह' च्या स्क्रीनिंगवेळी एकत्र दिसलं होतं. नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा झाला तर, कतरिना आणि विकीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्याप विकी आणि कतरिना यांच्या साखरपुड्याच्या अफवांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नसली तरी नेटिझन्स सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सलमान खानला पुन्हा डंप केल्याबद्दल अनेकांनी खेद व्यक्त केला आहे, तर अनेकजण सलमान खानची खिल्ली उडवत आहेत. या सोशल मीडिया प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत



विकी आणि कतरिना त्यांच्या नात्याबद्दल खूप गुप्तता बाळगतात. पण यापूर्वीच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, दोघंही त्यांचे नातं अधिकृत करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. असं देखील सांगितलं जात आहे की, कतरिना आणि विकी या वर्षाच्या अखेरीस लग्न करण्याची योजना आखत आहेत.



एका मुलाखतीदरम्यान अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरनेही विकी आणि कतरिनाच्या नात्याची पुष्टी केली. मात्र, हर्षवर्धन यांनी असंही म्हटले होतं की, या कमेंटनंतर मी अडचणीत येणार आहे. हर्षवर्धनच्या कमेंटनंतर कतरिना खूपच चिडली होती, असं अहवाल सांगतात.


कतरिना कैफ सध्या सलमान खानसोबत तिच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी पहिल्यांदाच दोन्ही स्टार्ससोबत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान देखील एक कॅमिओ करणार आहे.