मुंबई : झगमगत्या दुनियेत कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. अभिनेता कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सध्या तुफान चर्चेत असलेलं कपल आहे. दोघे लवकरचं लग्न करणार असल्याचं समजत आहे. शिवाय त्यांनी लग्नासाठी तयारी देखील सुरू केली आहे. लग्न जुळण्याआधी दोघांचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं आहे. रिलेशनशिप पूर्वी दोघांची अफेयर लिस्ट फार मोठी होती. कधी विकी कौशलचं अफेयर तर कधी कतरिनाचं ब्रेकअप कायम चर्चेत असायचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कौफसोबत नात्याची चर्चा रंगण्यापूर्वी विकी अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. एवढंच नाही तर दोघांचं ब्रेकअप कधी झालं आणि कतरिनासोबत विकीचं कधी जुळलं काही काळालचं नाही. 


विकी कौशल आणि हरलीन सेठी यांचे नाते 2019 पर्यंत घट्ट होते. विकीच्या 'उरी' चित्रपटाच्या वेळीही हरलीन जोरदार प्रमोशन करताना दिसली. मात्र, 'उरी'नंतर जेव्हा विकीने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली, तेव्हा हरलीन आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. ब्रेकअपनंतर हरलीनने विकीला सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि त्यांच्या ब्रेकअपशी संबंधित एक नोट सोशल मीडियावर शेअर केली.


कतरिनाबद्दल सांगायचं झालं तर तिच्या अफेयरची लिस्ट देखील काही छोटी नाही. कतरिनाचा पहिला अफेयर अभिनेता सलमान खानसोबत होतं. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. पण आज देखील ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  सलमाननंतर कतरिनाचे नाव सिद्धार्थ मल्ल्यासोबत जोडले गेले. 
सिद्धार्थ मल्ल्या हा विजय मल्ल्या यांचा मुलगा आहे. सिद्धार्थसोबत आयपीएल मॅचमध्ये कतरिना अनेकवेळा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला सपोर्ट करताना दिसली होती.


सिद्धार्थ मल्ल्यानंतर कतरिना कैफचं नाव रणबीर कपूरसोबतचे जोडलं गेलं. रणबीर आणि कतरिनाची जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यांच्या लग्नाची बातमीही आली होती, पण अचानक दोघांच्या ब्रेकअपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.