कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर `मेरी ख्रिसमस` `या` ओटीटीवर रिलीज
कतरिना आणि विजय सेतुपतीच्या `मेसी क्रिसमस` या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. श्रीराम राघवन यांनी अंधाधुन आणि बदलापूर सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
मुंबई : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून याने चित्रपटगृहात खूप कौतुक आणि प्रेम मिळवलं. सर्वाधिक चर्चेत असलेल्या थ्रिलर्सपैकी एक म्हणून आलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा OTT प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडिंग चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर समीक्षकांची प्रशंसा मिळालेला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांची मन जिंकून राज्य करत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. एका प्रेक्षकाने लिहिलं '' हा चित्रपट आणि त्यांची केमिस्ट्री. मॅच मेड इन हेवन'' दुसऱ्या एका चाहत्याने नमूद केलं आहे की, ''कतरिना कैफपासून माझी नजर हटवू शकत नाही ती चित्रपटात एन्जल दिसत आहे आणि तिचा अभिनय चित्तथरारक आहे'' आणि अजून एकाने कमेंट केली आहे की, , "काल रात्री पाहिला आणि हा सिनेमा खूप मनोरंजक आहे खूप प्रेम "
श्रीराम राघवनच्या दिग्दर्शनात पहिल्यांदाच चाहत्यांनी कतरिना कैफला अशा प्रकारात पाहिलं. या चित्रपटाने अभिनेत्रीच्या अष्टपैलुत्वावर तसेच तिच्या अभिनय कौशल्यावर प्रकाश टाकला. या चित्रपटाचे त्याच्या रोमांचक कथेसाठी कौतुक करण्यात आले होते, मात्र कतरिनाची विजय सेतुपतीसोबतची केमिस्ट्री चर्चेची ठरली. श्रीराम राघवन दिग्दर्शित सिनेमॅटिक तेजस्वी ठरले कारण त्याने IMDb वर 8.8 रेटिंग मिळवलं.
कतरिना आणि विजय सेतुपतीच्या 'मेसी क्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. श्रीराम राघवन यांनी अंधाधुन आणि बदलापूर सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीनं 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली होती. 'मला नेहमीच श्रीराम सरांसोबत काम करायचं होतं, थ्रिलर स्टोरी सांगण्यात ते मास्टर आहेत आणि ते दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात काम करणे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या चित्रपटात विजय सेतूपतीसोबत काम करण्यासाठी मी उस्तुक आहे', असे कतरिना म्हणाली होती. दरम्यान, हा चित्रपट 2023 मध्ये हिंदी आणि तमिळ भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र आता हा सिनेमा ओटीटीवर तुम्हाला केव्हाही पाहता येणार आहे.