मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये पार पडला. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स हनीमूनसाठी मालदीवला गेले होते. यानंतर दोघंही मुंबईत परतले. यानंतर  सातत्याने बातम्या समोर येत होत्या की,  कतरिनाला लग्नानंतर लगेच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' च्या शूटिंगला जाणार आहे. पण आता समोर आलेल्या बातमीनंतर तुम्हीही म्हणाल की, कतरिनाने लग्नाबरोबरच सलमान खानची फसवणूक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाने दिला सलमान खानला धोका
लग्नाच्या काही दिवसांनंतर नवी नवरी कतरिना पती विकीसोबत जास्त वेळ घालवू शकली नाही. याचं कारण सांगितलं जात आहे की, ती 'टायगर 3'चं शूटिंग करत होती. पण आता कतरिना 'टायगर 3'साठी नव्हे तर इतर कोणत्यातरी चित्रपटासाठी शूट करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. म्हणजेच 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगची तारीख बदलण्यात आली आहे.


मेरी ख्रिसमसचं आधी करणार  शूट
बातमीनुसार, लग्नानंतर कतरिना 'टायगर 3' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. श्रीराम राघवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वृत्तानुसार, कतरिना या आठवड्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू करू शकते. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये हे शूटिंग होणार आहे.


विकी कौशल सॅम बहादूर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त 
बातम्यांनुसार, विकी कौशल लग्नानंतर मेघना गुलजारच्या सॅम बहादूर या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. विकीशिवाय या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​दिसणार आहेत.