मुंबई : कतरिना कैफ नुकतीच तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलला भेटण्यासाठी इंदूरला पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतरिना डेसर्ट खाताना दिसत आहे. यादरम्यान, व्हिडिओमध्ये कतरिनाची मैत्रिण तिला असं काही सांगते, जे ऐकून कतरिना लाजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खात होती डिसर्ट 
व्हिडिओमध्ये कॅटरिनाशिवाय दोन लोकं तिच्या जवळ बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ पाहून असं दिसतंय की, व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेचा आवाज ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये कतरिना आरामात डिसर्ट खाताना दिसत आहे.


ही कसली कीटो डाईट
व्हिडिओमध्ये कतरिनाचा व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती म्हणते की, तू काय करते आहेस. याला प्रत्युत्तर देत कतरिना म्हणते की, हा केटो डाईट आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की, तुम्हा लोकांना हे कळलं पाहिजे की, ही कतरिनाची 7वी मिठाई आहे. हे ऐकून कतरिनाच्या बाजूचे लोक हसू लागतात आणि अभिनेत्री लाजते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फिटनेस फ्रीक आहे कतरीना 
कतरिना कैफचं नाव त्या बॉलिवूड हिरोइन्समध्ये समाविष्ट आहे जे फिटनेस फ्रिक आहेत. अनेकदा अभिनेत्रीचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. स्वतः अभिनेत्रीसुद्धा कधी-कधी तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.