Katrina Kaif Father: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपल्या परिवारापासून खूप दूर राहावं लागलं आहे. कधी कामामुळे तर कधी इतर कारणांमुळे. परंतु त्यातील असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपल्या पालकांपासून वैयक्तिक कारणांमुळेही (Bollywood Actors Personal Life) दूर राहावे लागले आहेत. घरोघरी मातीच्या चूली... पण आपल्या आईवडिलांपासून दूर राहणं, त्यांना न भेटणं, न पाहणं हेदेखील तितकंच संवेदनशील आणि दु:खद आहे. आजची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ देखील याच दु:खातून गेली आहे. आपल्या वडिलांपासून ती अधिक काळ दूर राहिली आहे ज्याबद्दल तिनं मध्यंतरी खुलासा केला होता. आपल्यालाही वडिलांची उणिव भासते (Katrina Kaif News) असं तिनं अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या अभिनेत्री या अनेकदा आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यांच्या या फोटोंना प्रचंड लाईक्सही येताना दिसतात. परंतु कतरिना मात्र आपल्या वडिलांसोबतचे फारसे फोटो टाकत नाही. मध्यंतरी तिनं 2019 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीतून यावर भाष्य केले होते. आपल्याला वडिलांचे प्रेम न मिळाल्याबद्दल तिनं आपलं दु:खही अनेकदा (Katrina Kaif Interview) व्यक्त केलं आहे. कतरिना कैफच्या वैयक्तिक आयुष्यात असे अनेक चढउतार आले आहेत. (katrina kaif had once got emotional while speaking about her father entertainment news in marathi)


जेव्हा कतरिना खूप लहान होती तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. कतरिनाचा सांभाळ तिच्या आईनं आणि बहिणीनं केला. यावेळी तिनं या आपल्या मुलाखतीतून फार भावनिक होत आपल्या वडिलांबद्दल सांगितले होते. ती म्हणाली की, ''माझा लहानपणापासून सांभाळ माझ्या आईनं केला आहे. परंतु मी जेव्हा माझ्या मित्रपरिवाराला त्यांच्या वडिलांसोबत वेळ घालवताना पाहते तेव्हा मात्र मला फारच दु:ख होते. परंतु मला आत्तापर्यंत जे काही मिळाले आहे त्यावरून मी फारच समाधानी आहे.''


हेही वाचा - CID मालिकेतील फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका सध्या काय करतेय? अभिनय सोडून निवडलंय 'हे' प्रोफेशन


कतरिनाला एकूण 5 बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे. त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध चांगले आहेत. मध्यंतरी इलियाना डिक्रुज कतरिनाच्या (Katrina Kaif Sister) भावाला सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता इलियाना डिक्रुज आई होणार आहे. कतरिना गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रेग्नंन्सींच्या चर्चांना भलतंच उधाण आलं आहे. त्यामुळे कतरिना आणि विकी कौशल भलतेच चर्चेत आहे. त्या दोघांनी 2021 च्या डिसेबंरमध्ये लग्नगाठ बांधली. 2003 पासून कतरिना बॉलिवूडमध्ये सक्रिय (Vicky Kaushal) आहे. विकी कौशल आणि कतरिना हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते आपले फोटोजही अनेकदा पोस्ट करताना दिसतात.