मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 27 डिसेंबर रोजी 56 वर्षांचा झाला आहे. या खास दिवशी जगभरातील चाहत्यांनी त्याला शुभेच्छा आणि भेटवस्तूंद्वारे खूप प्रेम दिलं आहे. या खास निमित्ताने सलमानच्या पनवेल फार्महाऊसवर एका ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर आता एक बातमी समोर येत आहे की, त्याच्या मित्र परिवारानेही सलमानला अनेक महागडे गिफ्ट पाठवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना आणि जॅकलिनने या भेटवस्तू दिल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानची खास मैत्रीण आणि अभिनेत्री कतरिना कैफने त्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून सोन्याचं ब्रेसलेट दिलं आहे, ज्याची किंमत सुमारे 2-3 लाख रुपये आहे. याशिवाय जॅकलिन फर्नांडिसने दबंग खानला  Chopardब्रँडचं घड्याळ दिलं आहे. ज्याची किंमत सुमारे 10-12 लाख रुपये आहे.


संजय दत्त आणि अनिल कपूरने दिले लाखोंचे गिफ्ट्स
सलमानचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जाणारा अभिनेता संजय दत्त याने सुपरस्टारला 7 ते 8 लाख रुपये किमतीचे डायमंड ब्रेसलेट भेट दिल्याची बातमी आहे. तर दुसरीकडे शिल्पा शेट्टीनेही सलमानला ब्रेसलेट दिलं आहे. ज्याची किंमत 16-17 लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर, अभिनेता अनिल कपूर यांनी सलमानला एक जॅकेट दिले आहे, ज्याची किंमत 27-29 लाख रुपये