मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल ही जोडी बॉलिवूडमधील सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दोघांनीही त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. जे चाहत्यांना चांगलेच आवडले होते. दरम्यान, कतरिना कैफने सोशल मीडियावर एक मजेदार आणि क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना तिचा पती विकी कौशलला तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटातील डायलॉग बोलून झोपेतून उठवताना दिसत आहे. त्याचबरोबर, विकी कौशल आपला चेहरा ब्लँकेटने झाकून अस्वस्थ होतो आणि पुन्हा झोपतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफने शेअर केला व्हिडिओ
कतरिना कैफने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, विक्की कौशल झोपलेला दिसतोय. तितक्यात  कतरिना त्याच्याकडे जाते आणि 'मैं भूत हूं - मैं भूत हूं' म्हणू लागते. त्यानंतर विकी घाबरतो आणि कॅटकडे बघतो. यानंतर अभिनेत्री पुन्हा तोच डायलॉग बोलते. पण उठण्याऐवजी विकी कौशल आपला चेहरा ब्लँकेटने झाकून झोपी जातो. व्हिडिओ शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिलं,  बायकोचा  क्यूट छोटा वेकअप कॉल.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा मजेदार व्हिडिओ कतरिना कैफने शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोकांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून प्रत्येकजण आपापल्या शैलीत या जोडीचं कौतुक करत आहे. या दोघांसाठी यंदाची दिवाळी खूप खास होती कारण दोघांनी लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रीचा आगामी चित्रपट
व्हिडिओमध्ये कतरिना कैफ जो डायलॉग बोलताना दिसत आहे तो तिच्या आगामी 'फोन भूत' या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये कतरिना भूताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. जो ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय कतरिना लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटातही दिसणार आहे.