मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरला आहे. जोधपूर सेशन कोर्टाने या प्रकरणामध्ये त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोन दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या सलमान खानची 50 हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.


मुंबईत परतला सलमान खान  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामीनावर सुटका होताच सलमान खान चार्टर प्लेनने जोधपूरहून मुंबईत पोहचला. गॅलेक्सी अपार्टमेंटखाली सलमान खानच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होतील सलमान खानने त्याच्या कुटुंबीयांसोबत गॅलेरीमध्ये येऊन चाहत्यांना अभिवादन केले. 


बॉलिवूड सलमानच्या भेटीला 


सलमान खानला अटक झाल्यानंतर त्याच्यावर लागलेल्या 500 कोटींचे भवितव्य धोक्यात आले होते. बॉलिवूडच्या सलमान  खानच्या पाठिशी उभी राहिली होती. सलमान तुरूंगात असताना अनेकांनी सलमान खानच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 


कॅटरीना गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये  


सलमान खान जोधपूरला जाण्यापूर्वी कॅटरिना कैफने सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन सलमानसाठी प्रार्थना केली होती. सलमान खानची जामिनावर सुटका होताच कॅटरिना तात्काळ गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहचली. त्याचे व्हिडिओही सोशलमीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. 


 



 


बॉलिवूड सलमानच्या पाठिशी 


सलमान खान जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असताना प्रीती झिंटाने त्याची भेट घेतली. तर सोनाक्षी सिंहा, बॉबी देओल सह अनेक बॉलिवूड कलाकार सलमान खानच्या भेटीला पोहचले.  सलमानच्या अटकेवर पहिल्यांदाच बोलले महेश मांजरेकर...