मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानवर आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सलमान खान सोबत सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलाम यांच्यावरही शिक्षेची सुनावणी होणार आहे. जोधापूरच्या न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2006 ला काळवीट शिकार प्रकरणी 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
जोधपूरजवळ भवाद गावाजवळ 26-17 सप्टेंबर 1998 च्या रात्री ही घटना घडली. त्यानंतर काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानवर 4 केस टाकण्यात आल्या.
काळवीट शिकार प्रकरणी विश्वोई समाजाने पोलिसआत तक्रार दाखल केली. काळवीट शिकार प्रकरणी तीन प्रकरणी सलमान खान आणि अन्य कलाकारांना दोषी बनवण्यात आलं.
काळवीट शिकार प्रकरणी 12 ऑक्टोबरला सलमान खानला पहिल्यांदा अतक झाली. त्यानंतर पाच दिवस सलमान खान तुरूंगात होता. 17 ऑक्टोबरला जामिनावर त्याची सुटका झाली. अटक झाली तेव्हा सलमान खानच्या खोलीमध्ये पोलिसांना पिस्तुल आणि रायफल मिळाली होती. या हत्यारांसाठी असलेलं लायसन्सची मुदतही संपली होती.
सलमान खानवर आर्म अॅक्ट अंर्तगत चौथी केस टाकण्यात आली. वाईल्ड लाईफ अॅक्ट च्या 149 नुसआर काळवीट शिकार प्रकारणी कमाल
7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अभिनेता सलमान खान 'रेस 3' चित्रपटाचे अबुधाबीतील शेड्युल संपवून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर लगेजच तो जोधपूरला रवाना झाला. सलमान खानसोबत त्याच्या बहिणी जोधपूरला पोहचल्या आहेत.